Maharashtra Bharat Jodo Yatra : कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील

Maharashtra Bharat Jodo Yatra
Maharashtra Bharat Jodo Yatra

गजानन लोंढे, हिंगोली : भारत जोडो यात्रेत माजी मंत्री सतेज पाटील यांच्या दहा हजारांवर समर्थकांनी आखाडा बाळापूर येथील सकाळच्या सत्रात फेटे बांधून सहभाग नोंदविला. नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा देत ही मंडळी सहभागी झाली होती. (Maharashtra Bharat Jodo Yatra)

कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी शनिवारी साडेसहाच्या सुमारास यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर तेथे हे फेटेधारी कोल्हापूरकर स्वागतासाठी सज्ज होते. गुलाबी थंडीत सकाळच्या वेळी रस्त्यावर दुतर्फा यांची भली मोठी रांग पाहायला मिळाली.

तर आमच ठरलयं असे बॅनर्सही त्यांच्या हातात झळकत होते. बसमधून ही मंडळी भल्या पहाटेच येथे दाखल झाली होती. त्यानंतर तेथे सर्वांना फेटे बांधण्यात आले. छत्रपती शाहू महाराज या कर्तृत्वान राजाची पुरोगामी राजा म्हणून ओळख होती. त्यांनी समतेचा विचार दिला. तोच विचार पुढे घेऊन राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. त्यामुळे आम्ही दहा हजार कोल्हापूरकर या यात्रेत सहभागी झाल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Bharat Jodo Yatra
Maharashtra Bharat Jodo Yatra

हेही वाचा

Maharashtra Bharat Jodo Yatra
Maharashtra Bharat Jodo Yatra

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news