

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यास अन्य मागण्यांचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने प्रांत अधिकारी यांना देण्यात आले. अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य झाल्यास राज्य सरकारच्या विरोधात सात नोव्हेंबर रोजी शिरोली येथे महामार्गावर रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
परतीच्या पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जोरदार हजेरी लावली. काही काही वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. परिणामी, हातात तोंडाला आलेली पिके पाण्यात अक्षरशः खराब झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरून अनेकांचे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. झाले कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीचा पाढाच वाचला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी शेतमजुरांना प्रतिदिन तीनशे रुपये अनुदान द्यावे, त्यांना प्रत्येकी २५ किलो मोफत धान्य द्यावे आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड मधुकर पाटील आनंद शेट्टी सयाजी चव्हाण मंगल मुसळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.