कमल किशोर मिश्रा
Latest
Kamal Mishra : सिनेनिर्मात्याने पत्नीला गाडीखाली चिरडले; पत्नी गंभीर जखमी; थरार कॅमेऱ्यात कैद
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमधील एक सिनेनिर्मात्याने आपल्या बायकोच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घडली आहे अंधेरीमध्ये. कमल किशोर मिश्रा (Kamal Mishra) असं त्या सिनेनिर्मात्याचे नाव आहे. ते फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध आहेत. वाचा सविस्तर बातमी.
Kamal Mishra : घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
माहीतीनुसार अंधेरी येथे १९ ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक व्यक्ती एका महिलेला आपल्या गाडीच्या आडव्या येणाऱ्या एका महिलेला चिरडताना दिसत आहे. ज्या व्यक्तीने त्या महिलेच्या अंगावर गाडी घातली आहे तो तिचा पती असून, त्याचं नाव कमल किशोर मिश्रा (Kamal Kishor Mishra) आहे. कमल मिश्रा हे फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध आहेत. कमल किशोर मिश्रा यांच्यावर अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. कमल मिश्रा यांनी अंगावर कार घातल्याने त्या गाडी खाली चिरडल्या गेल्या. यात त्या जखमी झाल्या आहेत.
दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले
घटना अशी की, कमल किशोर यांच्या पत्नीने कमल यांना अंधेरी पश्चिमेच्या राहत्या इमारतीतील पार्किंगमध्ये दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्यांनी कारमधून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या कमल यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला. कमल यांनी विरोध करणाऱ्या पत्नीला न जुमानता त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात त्या पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. पायाला, डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यांच्या ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कमल किशोर यांच्या पत्नीवर सध्या उपचार सुरु आहेत. बुधवारी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचलंत का ?
- Actress Diwali look : मराठी अभिनेत्रींचा दिवाळी नखरा, एक नंबर फोटो ?
- Ranveer Singh Nude Photoshoot : 'तो' फोटो मॉर्फ केल्याचा अभिनेता रणवीर सिंहचा दावा
- FIR against Chetan Ahimsa: 'कांतारा' फेम अभिनेता चेतन अहिंसावर गुन्हा दाखल
- Kushal Badrike : 'अख्ख घर दाटून आल्यासारख…' अभिनेता कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

