बेळगाव : दिवाळीत तीन दिवसांत ७५० टन फुलांची विक्रमी विक्री

बेळगाव : दिवाळीत तीन दिवसांत ७५० टन फुलांची विक्रमी विक्री

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; सोमवारपासून बुधवारपर्यंत बेळगाव येथील फुल मार्केटमध्ये साडेसात ७५० टन फुलांची विक्रमी विक्री झाली. तीन दिवसांत झेंडू, मोगरा व गलाटा फुलांना मागणी वाढल्याने या फुलांचा दर आठ पट वाढला होता. सोमवारी झेंडूच्या फुलांचा दर १०० रुपये किलो होता. तो बुधवारी २०० रुपये किलो झाला. होलसेल फुल मार्केटमध्ये गलाट्याची फुले १२० रुपये किलो होती. ती बुधवारी ३०० रुपये किलो वरती पोहोचली.

मोगरा फुलांची मागणी वाढल्याने ५० रुपयाला मिळणारा फुलांचा गुच्छ १०० रुपये वरती पोहोचला. गुलाबाच्या फुलांना मागणी वाढल्याने त्या फुलांचा दर ३०० रुपये किलोच्या घरात पोचला. फुलांच्या हाराचे दर तीन पट वाढले होते. २० रुपये मिळणारा हार ६० ते ८० रुपये झाला. झेंडू फुलाचा हार ९० ते १५० रुपये दराने विकला गेला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news