कोल्‍हापूर: ऊस परिसंवाद व महिला बचत गट कार्यशाळा संपन्न | पुढारी

कोल्‍हापूर: ऊस परिसंवाद व महिला बचत गट कार्यशाळा संपन्न

कवठेगुलंद (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील कवठेगुलंद येथे ऊस परिसंवाद व महिला बचत गट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांनी केवळ आपल्या शेतीतील उत्पादन व उत्पादकता न वाढवता हे उत्पादन केलेली शेतीमाल विपणन कसे करता येईल व त्यासाठी विविध पर्याय आहेत. तयाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. त्यातून आर्थिक फायदा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घ्यावा. यामध्ये महिलांचे सहभाग मोठया प्रमाणात व्हावा, असे आवाहन मकरंद कुलकर्णी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमावेळी ऊस उत्पादन तंत्रज्ञान याबद्दल कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ऊस लागवडी पासून ऊस काढणी पर्यंतचे सर्व बारखावे शेतकऱ्यांना समजून सांगितले. यावेळी विशेषतः रुंद सरीचा वापर व बेणे प्लॉटची उत्तम बेणे खरेदी केले व खत व्यवस्थापन योग्य केल्यास उत्पादन येईल असे सांगितले.

मॅग्नेट प्रकल्पासाठी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे कोणते प्रकल्प उभा करता येतील व कोणत्या अनुषंगाने सत्यजित भोसले यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी अक्षय उदाली यांनी मार्गदर्शन केले व शशिकांत कांबळे, कृषी पर्यवेक्षक कुरुंदवाड यांनी कृषी विभागाच्या महिला बचत गट व इतर योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीची कृषी विज्ञान केंद्र,तळसंदे व कृष्णा व्हॅली को-ऑपरेटिव्ह शेतकरी उत्पादक संस्था मर्यादित कवठेगुलंद ता. शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रकाश भेंडवडे, प्रमुख पाहुणे मकरंद कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर, प्रमिला रमेश जगताप, सरपंच कवठेगुलंद गुरुपाद केठगाळे, उपसरपंच बाबगोंडा पाटील तंटामुक्त अध्यक्ष उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी राजकुमार चौगुले, सुरेश केसरकाणे, आनंदा कुमे, आदिनाथ आरबाळे, अक्लाक पटेल, कृष्णदेव इंगळे, सौ सुनंदा भेंडवडे, राजेश डवरी,बाबासो पाटील, बाबासो कांबळे, रावसो पाटील, मारुती गावडे, अशोक चव्हाण, शशिकांत शिंदे, बाबुराव पाटील, राजू भेंडवडे, सचिन राजमाने, महावीर अलगुरे, अनिल अलगुरे, दीपक इंगळे, ओंकार जगताप,रणजितसिंह शिंदे सरकार, नंज्याप्पा भेंडवडे, मोहशीन वाळवेकर, अविनाश कदम, प्रमोद भेंदवडे, बंटीराजे निंबाळकर ,कुमार जगताप,विनोद जगताप,संजय शिंदे,एन.डि.पाटील,शामा पाटील,आप्पासो बेळंके,अवधूत जगताप उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button