कोल्हापूर : ‘AIFF’च्या फायनान्स कमिटीच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे; महिला समिती सदस्यापदी मधुरिमाराजे यांची निवड

'AIFF'च्या फायनान्स कमिटीच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे
'AIFF'च्या फायनान्स कमिटीच्या उपाध्यक्षपदी मालोजीराजे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (AIFF) अध्यक्ष कल्याण चोबे यांच्या अध्यक्षतेखाली कोलकता येथे आज (दि.१९) कार्यकारिणी मंडळाची सभा झाली. या सभेसाठी नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या सभेत विविध समित्या तयार करण्यात आल्या. यामध्ये विशेष महत्त्व असलेल्या फायनान्स समितीवर मालोजीराजे छत्रपती यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. याशिवाय स्पर्धा समितीवर सदस्य म्हणूनही निवड झाली.

त्याचबरोबर १७ वर्षाखालील मुली जागतिक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत (AIFF) महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी एआयएफएफचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. अशाप्रकारे वरील महत्त्वाच्या तीन समित्यांवर कामकाज करण्याचा बहुमान मालोजीराजे छत्रपती यांच्यामुळे कोल्हापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.

या सभेमध्ये केएसएच्या पेट्रन मधुरिमाराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राच्या फुटबॉल क्षेत्रात केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन त्यांची एआयएफएफ महिला समिती सदस्या म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपरोक्त निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केएसएचे पेट्रन-इन्‌-चीफ्‌ श्री शाहू छत्रपती महाराज व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news