

पुणे, पुढारी वृत्तसेवा: देशातील ज्या 144 लोकसभा जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे त्या मध्ये 12 लोकसभा मतदार संघ हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये बारामती आणि शिरूर या मतदार संघाचा समावेश आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत 19 ऑगस्ट रोजी दिली. 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान अर्थमंत्री सीतारामन या संपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या विकास कामाबाबत आढावा घेऊन मतदारांचे मत जाणून घेणार आहेत. २०२४ मध्ये पुण्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे.