कोल्‍हापूर : किणी व तासवडे टोल मुदत संपली ; पण पुढे वसुली सुरूच | पुढारी

कोल्‍हापूर : किणी व तासवडे टोल मुदत संपली ; पण पुढे वसुली सुरूच

शिरोली (कोल्‍हापूर), सुनिल कांबळे : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरिकरणानंतर गेली विस वर्षे अव्याहतपणे किणी व तासवडे टोल वसुली सुरु आहे. या कागल ते सातारा महामार्गाच्या चौपदरीकरणाची विस वर्षांची मुदत २ मे २०२२ रोजी संपली आहे. टोल ठेकेदार नसले तरी या पुढील ५३ दिवस रस्ते विकास महामंडळ पथकर वसुली‌ तशीच सुरू ठेवणार आहे. या शासनाच्या निर्णयाबाबत वहानधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सन २००२ मध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कागल‌ सातारा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या महामार्गाची पथकर वसुलीची मुदत २० वर्षांची होती. कागल-सातारा चौपदरीकरणाची मेमहिन्यात मुदत संपली आहे. पण गेल्या वीस वर्षांत नोटा बंदी, कोरोना लॉकडाऊन काळात ५३ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती. हे कारण पुढे करत विकास महामंडळाला ५३ दिवस वसुलीसाठी मुदत वाढवून मिळाली आहे. २५ जून २०२२ पर्यंत पथकर वसुली रस्ते विकास महामंडळ करणार आहे. २५ जून नंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे.

या रस्त्याची देखभाल राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती. मे २०२२ मध्ये महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची २० वर्षांची देखभाल दुरुस्तीची मुदत संपली आहे.आणि ५३ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. यानंतर हा महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे.
मुदत संपलेली असताना ही होत असलेल्या टोल वसुलीच्या विरोधात भुमिका घेत टोल वसुली निर्णयास ट्रान्सपोर्ट असोसिएशन आँफ नागांव शिरोली यांनी विरोध केला. आणि असोसिएशनचे अध्यक्ष कूलभुषण कोळी यांनी वहानधारकांना टोल देऊ नये असे आवाहन केले.

हेही वाचा  

Back to top button