'कोल्हापूर उत्तर'चा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार : सतेज पाटील | पुढारी

'कोल्हापूर उत्तर'चा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या पाश्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध होणार होती. पण ही निवडणूक भाजपनं लादली. कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे गेलो. यामुळे लोक आमच्या बाजूने कौल देतील. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महिला आमदार कधीही झालेले नाही. आज एक महिला आमदार येथून विधानसभेत जाईल, अशी आशा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या यातून निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र ती चुरस मतदानात फारशी दिसली नाही. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १२) ६१.१९ टक्के मतदान झाले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काय आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास ? | कोल्हापूर उत्तर पोटनिवडनूक 2022

Back to top button