कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांची दहशत, एका शाळकरी मुलांसह पाच जणांचे लचके तोडले | पुढारी

कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांची दहशत, एका शाळकरी मुलांसह पाच जणांचे लचके तोडले

 कोल्हापूर; पुढारी वृतसेवा : विक्रमनगर टेंबलाईवाडी (जि.कोल्हापुर) टाकाळा परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. आठ दिवसात एका शाळकरी मुलांसह पाच जणांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने भीती आणि चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.

भटक्‍या कुत्र्यांची दहशत

रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना शाळकरी मुलांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. भटक्‍या कुत्र्यांची दहशत  वाढलेली असतानाही महापालिकेच्या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी रात्री जेवण करून घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. डोक्यासह शरीराचे लचके तोडल्याने गंभीर अवस्थेत मुलाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले आहेत.

पाठलाग करून कुत्र्याने केला महिलेवर हल्ला

बुधवारी सायंकाळी घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करून कुत्र्याने हल्ला चढवला. नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने महिलेचा जीव बचावला. गेल्या आठवड्यापासून रामानंदनगर, जरगनगर, सुर्वेनगर, सानेगुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, कंदलगाव, आर. के. नगरसह परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

हेही वाचलंत का? 

Back to top button