नांदगाव, पुढारी वृत्तसेवा : रंगेहाथ लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भूमी अभिलेख विभागाचा उप अधीक्षक विलास दाणी याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. मालेगाव येथील अप्पर सत्र जिल्हा न्यायधीश डी. डी. कुरुळकर यांच्या न्यायालयात दाणीला हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मनमाड येथील तक्रारदार व त्यांच्या भागीदार असलेल्या भूखंडाचे अतितातडीचे बिनशेती मोजणी करून नकाशा तयार करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या येथील तालुका भूमी अभिलेख विभागाचा उपाधीक्षक विलास पांडुरंग दाणी याला मंगळवारी धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.