देशातील महागाई कशी वाढवायची, पंतप्रधान मोदी रोज सकाळी विचार करतात : राहुल गांधी

Pm Modi Vs Rahul Gandhi
Pm Modi Vs Rahul Gandhi
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, खासगीकरण आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या दैनंदिन कामांची यादी त्यांनी ट्विटमध्ये जाहीर केली आहे. यासोबतच राहुल गांधींनी "रोझ मॉर्निंग की बात" असे लिहिले आहे.

काय आहे पंतप्रधानांच्या दैनंदिन कामाची यादी

  • पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवायचे?
  • लोकांचे 'खर्चे पे चर्चा' कसे थांबवायचे?
  • तरुणांना रोजगाराची रिकामी स्वप्ने कशी दाखवायची?
  • मी आज कोणत्या सरकारी कंपनीची विक्री करावी?
  • शेतकऱ्यांना अधिक लाचार कसे करावे?
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठव्यांदा वाढ झाली आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 मार्च ते 30 मार्चपर्यंत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्‍हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र वाढत आहेत.

दरम्‍यान, यापूर्वी 24 मार्च रोजी राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी लिहिले की, केंद्र सरकारने कोरोनाबाधितांवर मोफत उपचार केले होते का? गरीब आणि कामगारांना किमान उत्पन्न देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण केले का? सरकारने लघुउद्योगांना बुडण्यापासून वाचवले का? असे आरोप राहूल गांधींनी केले.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news