cm uddhav thackeray आज कोल्हापुरात महापूरग्रस्त भागाची पाहणी करणार | पुढारी

cm uddhav thackeray आज कोल्हापुरात महापूरग्रस्त भागाची पाहणी करणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज, शुक्रवारी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे.

आगमनानंतर ते मोटारीने शिरोळला जाणार आहेत. नंतर सव्वाअकरा वाजण्याचा सुमारास शिरोळ व नृसिंहवाडी येथील पूरबाधित भागाची पाहणी करणार आहेत.

दुपारी 12 वाजता मोटारीने कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

1.15 वाजता गंगावेस ते पंचगंगा हॉस्पिटल परिसराची पाहणी व नंतर शिवाजी पूल येथून पूरग्रस्त भागाची माहिती घेणार आहेत.

दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीचा आढावा ते घेतील.

त्यानंतर पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता ते मुंबईला रवाना होतील.

Back to top button