कोल्हापूर : जगजाहीर प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर बंद खोलीत सुनावणी | पुढारी

कोल्हापूर : जगजाहीर प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर बंद खोलीत सुनावणी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महापालिका प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर केली. त्यावर तब्बल 115 हरकती दाखल झाल्या. परंतु, गोपनीयतेचे कारण देत जगजाहीर प्रभाग रचनेच्या हरकतींवर बंद खोलीत सुनावणी घेण्यात आली. हरकतदारांच्या दुपटीएवढा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 18 हरकतदार गैरहजर राहिले. दरम्यान, हरकतींची योग्य दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा काही इच्छुकांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

शहरात पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यांतर्गत महापालिकेने 31 प्रभाग केले आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांसाठी 30 व दोन नगरसेवकांचा 1 प्रभाग असेल. 1 फेब्रुवारीला महापालिकेने प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत होती. वेबसाईटवर आणि सोशल मीडियावरही लिंकद्वारे प्रभाग रचना पाहण्यासाठी उपलब्ध होती.

साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी प्र. म. परब, एस. एस. वराडे, प्रवीण देवरे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त विनायक औंधकर, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. 4 मार्चला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.

प्रभागनिहाय हरकती, कंसात संख्या, ठिकाण – प्रभाग क्र. 8, 9, 11 (22) राजेबागस्वार, पंचायत समिती, पद्मा टॉकीज, टायटन शोरूमजवळ. प्रभाग क्र. 11, 12, 18, 20 (12) कैलासगड स्वारी, मंडलिक वसाहत, तुरबत, चौंडेश्वरी, शिंगोशी मार्केट. प्रभाग क्र. 2, 3 (9) अष्टेकरनगर, हनुमान तलाव कसबा बावडा. प्रभाग क्र. 20, 28, 29 (6) निर्माण चौक. प्रभाग क्र. 6, 7 (5) न्यू शाहूपुरी. प्रभाग क्र. 21, 28 (5) विजयनगर. प्रभाग क्र. 27, 28 (5) कळंबा जेल. प्रभाग क्र. 13, 14 (5) मातंग वसाहत राजारामपुरी. प्रभाग क्र. 19, 20 (4) कालिकापूरम अपार्टमेंट. प्रभाग क्र. 22 (4) गांधी मैदान. प्रभाग क्र. 20, 22 (4) मोजणी ऑफिस. प्रभाग क्र. 12, 13 (4) नाईक आणि कंपनी. प्रभाग क्र. 5, 6 (4) दत्त मंदिर महाडिक वसाहत. प्रभाग क्र. 35 (3) जनरल. प्रभाग क्र. 11, 23, 24, 19 (2) बिनखांबी परिसर. प्रभाग क्र. 28 (2) सुधाकर जोशीनगर. प्रभाग क्र. 9, 28 (2) सहमत केएमसी. प्रभाग क्र. 25, 27, 28 (2) व्याप्तीबाबत मनोरमानगर. प्रभाग क्र. 4, 5 (2) कदमवाडी डीपी रोड. प्रभाग क्र. 1, 2, 3, 4 (2) आरक्षणाबाबत.

प्रभाग क्र. 9, 14 (1) रानडे विद्यालय. प्रभाग क्र. 9, 10 (1) सोन्या मारुती चौक. प्रभाग क्र. 12, 13 (1) देवल क्लबसमोर. प्रभाग क्र. 18 (1) नेहरूनगर. प्रभाग क्र. 7 (1) व्हिनस कॉर्नर. प्रभाग क्र. 25, 26, 31 (1) क्रांतिसिंह नाना पाटीलनगर. प्रभाग क्र. 19, 30 (1) एस.एस.सी. बोर्ड रिंगरोड. प्रभाग क्र. 13, 14 (1) साईक्स एक्स्टेंशन. प्रभाग क्र. 25, 26 (1) हरिओमनगर. प्रभाग क्र. 23, 24 (1) रंकाळा टॉवर. प्रभाग क्र. 21, 28 (1) देवकर पाणंद.

माजी महापौरांचे सासरे – माजी नगरसेवकांत वादावादी

एका नेत्याचा स्वीय सहायक, कारभारी माजी नगरसेवक व माजी महापौरांचे सासरे, दीर यांच्यात हरकतीवरून वादावादी झाली. नेत्यांनी एकमेकांच्या प्रभागांत ढवळाढवळ करायची नाही, अशी ताकीद दिली असतानाही हरकत का दिली? अशी विचारणा माजी महापौरांच्या सासर्‍यांनी संबंधितांना केली. त्यावरून चौघांत जोरदार वादावादी झाली.

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर सुनावणी घेण्यात आली. यात नैसर्गिक नदी, नाले, राष्ट्रीय महामार्गांविषयी तक्रारींचा समावेश आहे. काही हरकतदारांनी जुन्या प्रभागानिहाय सीमा गृहीत धरून तक्रारी केल्या आहेत. वास्तविक, सेन्सेक्स, ब्लॉक याची माहिती नसल्याने गैरसमजातून हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींविषयीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला 2 मार्चला सादर केला जाईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button