कोल्हापूर : रंकाळा पुन्हा ओव्हर फ्लो; २००५ ची पुनरावृत्ती! (video) | पुढारी

कोल्हापूर : रंकाळा पुन्हा ओव्हर फ्लो; २००५ ची पुनरावृत्ती! (video)

 

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :

रंकाळा पुन्हा एकदा ऑव्हरफ्लो झाला. आज ( दि. २२ ) सायंकाळी रंकाळ्याच्या कठड्यावरून पाणी वाहू लागले. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या धुवाँधार पावसामुळे दुपारीच रंकाळा पूर्ण भरुन गेला होता.

यापूर्वी २००५ ला रंकाळ्याच्या कठड्यावरून पाणी बाहेर आले होते. हा क्षण पाहण्यासाठी त्यावेळी जिल्ह्यातून लोक येत होते. अशाच प्राकारे आजही रंकाळा ओव्हर फ्लो होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर

राज्यात सर्वदूर पावसाचा जोर आहे. मुख्यतः घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज गुरुवारी (दि.२२) हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत उद्या शुक्रवारी (दि.२३) मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ : पन्हाळ्याच्या तीन दरवाजामध्ये आले पाणी

Back to top button