दुकानात वाईन, नॉट फाईन! निर्णयाचा फेरविचार करावा | पुढारी

दुकानात वाईन, नॉट फाईन! निर्णयाचा फेरविचार करावा

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

किराणा मालाच्या दुकानांत वाईनची विक्री करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबाबत सोशल मीडिया, ग्राहक तसेच किरकोळ दुकानदार यांच्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी ‘दुकानात वाईन, नॉट फाईन’ (योग्य नाही) असे सांगत शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मत व्यक्त केले आहे.

दारू पिणे आरोग्यास अपायकारक असल्याबाबत शासनच विविध माध्यमांतून जनजागृती करते. मात्र, आता शासनच मॉल, सुपरमार्केट्स अन् मोठ्या दुकानांत वाईन विक्रीला परवानगी देऊन काय सिद्ध करू पाहत आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

दारूच्या दुकानात रात्री दारू खरेदीसाठी गर्दी जास्त होते. कारण, रात्रीच्या अंधारात आपल्याला कोण ओळखत नाही, दिवसा दारू आणायला जाताना लपून छपून जायचे असे प्रकार सर्रास होत होते. कालांतराने दारू पिण्याचे फायदे व तोटे सांगितले जाऊ लागले. कोणती दारू आरोग्याला चांगली किती, त्याचे प्रमाण किती असावे यावरही सल्ले दिले जाऊ लागले. ज्यात अल्कोहोल आहे ती दारू, मग कोणत्या दारूत किती अल्कोहोल आहे याची चाचपणी करून दारू रिचवण्याला सुरुवात झाली. यातून दारूचे विविध प्रकार पडले.

द्राक्षापासून वाईन बनवली जाते. एरवी आपण द्राक्षे खातोच; मग त्यापासून बनवलेली वाईन घेतली तर काय बिघडले? असा म्हणणारा एक समाज घटक आहे; पण जी वाईन वाईन शॉप किंवा दारूच्या दुकानात मिळत होती, ती आता सहजपणे किराणा मालाच्या दुकानांत उपलब्ध होणार आहे. शासनाने तसा निर्णयच घेतल्याने काहींनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी हा निर्णय चुकीचा असून शासनाने याचा फेरविचार करावा, असे मत व्यक्त केले.

किराणा मालाच्या दुकानांत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी महिलावर्गही येत असतो. त्यांच्यासोबत लहान मुलेही असतात. वाईनकडे दारू म्हणूनच पाहिले जाते. त्यात अल्कोहोलचे किती प्रमाण आहे याचा विचार न करता घरातील लोकांबरोबर आलेल्या मुलाने वाईन मागितली तर पालक ते देणार का? आणि ज्या दुकानात वाईन विक्रीला असेल तेथे ग्राहक येणारही नाहीत. वाईन विक्रीला कोण ठेवणार, हा वेगळा विषय आहे; पण शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा.
– संदीप वीर, उपाध्यक्ष, किराणा भुसारी असोसिएशन

किराणा मालाचा दुकानांत वाईन विक्री करण्?याबाबत शासनाच्?या अनेक नियम व अटी आहेत. मुळातच जी गोष्?ट शालेय मुलांनाही माहिती नाही, त्याची माहिती शासनाच्?या या निर्णयाने होत आहे. चित्रपटांमुळे हल्लीची पिढी व्यसनाधीन बनत आहे. त्यांना पुन्हा व्यसनाधीनतेकडे शासन नेत आहे असे वाटते. केवळ शेतकर्‍याला फायदा होणार, या नावाखाली सरसकट किराणा दुकानांत वाईन विक्री करण्याचा निर्णय चुकीचा आहे.
– बबन महाजन, किरकोळ व्यापारी

वाईन संस्कृती ही आपली संस्कृती नाही. महाराष्ट्राला धार्मिक-आध्यात्मिक परंपरा आहे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी वाईन संस्कृती आणणे चुकीचे आहे. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव द्या, सोयाबिनला हमीभाव दिल्याने अनेक शेतकरी त्याचे उत्पादन घेत आहेत. शेतकर्‍यांचा फायदा होतो असे सांगून किराणा दुकानांत वाईन विक्रीला ठेवून नव्या पिढीला व्यसनाधीन बनविण्याचा सरकारचा हा निर्णय चुकीचा वाटतो.
– जयाजी घोरपडे, पालक

गेल्या अडीच वर्षांपासून शासनाने केलेल्या काही चांगल्या कामांवर असा निर्णय घेऊन पाणी फिरवले आहे. सध्या एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली काही पेये बाजारात आहेत. मॉल्स व औैषध दुकानांत ती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक मुले त्याच्या आहारी गेली आहेत. हाच प्रकार वाईनबाबत होण्याची शक्यता आहे. त्यात किती प्रमाणात अल्कोहोल आहे, हा वेगळा विषय आहे; पण केवळ महसूल मिळविण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा.
– उमेश पाटील, नागरिक

Back to top button