केज : पुढारी वृत्तसेवा
कुत्रा माणसाला चावला, तर त्याची बातमी होत नाही. मात्र माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते. अगदी तसाच केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या बाजारात झालेल्या भांडणाच्या रागातून बस स्टॅंडवरच्या चौकात पुन्हा भांडण झालं अन् चक्क एकाने दुसऱ्याच्या हाताच्या बोटाला चावा घेतला आहे. दि.२० जानेवारी गुरुवार रोजी साळेगाव ता. केज येथील जनावरांच्या आठवडी बाजारात खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून दिपक मुळे आणि शाम मुळे व ओम मुळे यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी उपस्थितांनी भांडण सोडविले. (Beed)
त्या नंतर रात्री ७:०० वा. साळेगावच्या बस स्टँडवर दीपक मुळे यांनी शाम मुळे व ओम मुळे यांना जाब विचारला. त्यावेळी पुन्हा शाम मुळे व ओम मुळे यांनी दीपक मुळे याला दोघांनी हातानी मिठी मारून पकडले. ओम मुळे याने दीपक मुळे याचे डाव्या हाताचे मधले बोट तोंडात धरून कडकडून चावला. त्यामुळे दीपक मुळे याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला कांड्याजवळ जखम झाली असून बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच ओम मुळे याने दीपक मुळेला शिवीगाळ करून लाथा-बुक्याने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. (Beed)
या प्रकरणी दीपक मुळे याने दि. २६ जानेवारी रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून शाम मुळे व ओम मुळे यांच्या विरुद्ध गु.र.नं. १७/२०२२ भा.दं.वि. ३२५, ३२३, ५०४, ५०६ ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या मानवी दंशाची चर्चा सर्वत्र होत आहे. (Beed)
हेही वाचलतंं का?