कोल्हापूर : जुनी देवल क्लबची इमारत उतरवली | पुढारी

कोल्हापूर : जुनी देवल क्लबची इमारत उतरवली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भारतातील पहिला संगीत क्लब म्हणून ख्याती असलेल्या व अनेक दिग्गज गायकांच्या संगीत मैफलींचा साक्षीदार असणार्‍या जुन्या देवल क्लबची इमारत उतरवण्यात आली. ही जागा नव्याने विकसित करण्यात येणार असल्याचे देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.

भालजी पेंढारकर, गुंडोपंत वालावलकर, बाबा आळतेकर, किशाबापू पेटकर, जयंतराव देशपांडे, बापूसाहेब तोफखाने आदींनी कोल्हापूरच्या गायन क्षेत्रात योगदान दिले. या इमारतीसाठीची जागा शाहू महाराजांनी देणगी म्हणून दिली होती. 1996 साली या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊन 1919 मध्ये इमारत पूर्ण झाली. त्या काळात गायन तसेच नाटकांच्या अनेक तालमी या देवल क्लबमध्ये होत. अनेक संगीत मैफलींची साक्षीदार ही इमारत आहे.

गेल्या दहा वर्षांपासूनही इमारत धोकादायक झाली होती. ही इमारत पाडून या जागेवर नवीन तीन मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत वरच्या मजल्यावर गायनातील दिग्गजांच्या नावे गुरुकुल शिक्षण विभाग सुरू करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Back to top button