कोल्हापूर : दुकाने कायमची बंद करू; शासनाने अनुदान द्यावे

कोल्हापूर : दुकाने कायमची बंद करू; शासनाने अनुदान द्यावे
Published on
Updated on

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले
दुकानात गर्दी होते म्हणून महापालिका व पोलिसांकडून होणार्‍या कारवाईला व्यापारी वर्ग वैतागला आहे. दिवसभर मिळवलेली कमाई जर महापालिकेचा दंड भरण्यास घालवायची असेल तर व्यवसाय न केलेलाच बरा, अशी मानसिकता व्यापार्‍यांची झाली आहे. त्यामुळे सगळीच दुकाने बंद ठेवतो, शासनाने या काळात अनुदान द्यावे, अशी मागणी व्यापार्‍यांकडून होत आहे.

व्यापार, उद्योगाला आर्थिक फटका

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने संपूर्ण व्यापार, उद्योगाला आर्थिक फटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. सण, उत्सव, लग्नसराई यावर बंदी घातली होती. याचा फटका व्यापार्‍यांना मोठया प्रमाणात बसला.

स्वत:ची अचारसंहिता

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शासनाने लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्यानंतर व्यापार उद्योग पूर्ववत सुरू झाला; पण कोरोनाची तिसरी लाट आली आणि व्यापार्‍यांना पुन्हा लॉकडाऊनची धडकी बसली. शासनाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन पुन्हा निर्बंध घातले आहेत. शासन नियमांचे पालन करून व्यापार्‍यांनी स्वत:ची अचारसंहिता तयार करत दुकाने सुरू केली; पण आता महापालिका व पोलिस यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून पुन्हा दुकाने बंद करण्याची व्यापारी वर्गाची मानसिकता झाली आहे.

शासन नियमांचे आम्ही पालन करतो. 

शासन नियमांचे आम्ही पालन करतो. दुकाने उघडल्याशिवाय ग्राहक येत नाहीत. व्यापार्‍यांनी स्वत:ची अचारसंहिता तयार केली आहे; पण महापालिका व पोलिस यंत्रणेकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी व्यापार करायचा की दंड भरत बसायचे, असा सवाल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी उपस्थित केला. विनाकारण कारवाई होत असेल तर सर्वच व्यापार बंद करतो, असा इशारा देत शासनाने दुकाने बंदच्?या काळात आम्हाला तत्काळ अनुदानही द्यावे, अशी मागणी शेटे यांनी केली.

चहा पिताना मास्क कशाला काढता?

दुकाने सुरू झाल्यानंतर महापालिकेचे पथक येऊन गर्दी वाढली म्हणून दुकानदाराला 500 ते 1000 रुपयांचा दंड करत आहे. अनेक दुकानांत मास्क लावून ग्राहक उभे असतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर रस्त्यावर लोकांना उभे करावे लागेल. त्यामुळे ग्राहकांना योग्य त्या सूचना देऊनच व्यवसाय केला जात आहे. रस्त्यावरून जाणारे लोक जरी दुकानासमोर उभे राहिले तरी दुकानदाराला दंड केला जात आहे. दिवसा महापालिका व रात्री सातनंतर पोलिस यंत्रणा माईकवरून लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करते. यामुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायावरही गंडांतर आले आहे. चहा, नाष्टा करताना मास्क का काढला असा प्रश्न विचारणार्‍या महापालिकेच्या महाभाग यंत्रणेला फेरीवाल्यांनीही

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news