दिल्‍लीत खासगी कार्यालयांसाठी ‘वर्क फॉर्म होम’, रेस्‍टारंटसह बारही राहणार बंद | पुढारी

दिल्‍लीत खासगी कार्यालयांसाठी 'वर्क फॉर्म होम', रेस्‍टारंटसह बारही राहणार बंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

दिल्‍लीत वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे आजपासून नवे निर्बंध आज जारी करण्‍यात आले. आता पुढील आदेश येईपर्यंत सर्व खासगी कार्यालये आणि रेस्‍टारंटसह बार बंद राहणार आहेत. खासगी कार्यालयांनी ‘वर्क फॉर्म होम’ व्‍दारे आपले काम सुरु ठेवावे, असे आदेशात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. यापूर्वी खासगी कार्यालये आणि रेस्‍टॉरंट ५० टक्‍के क्षमतेने सुरु ठेवण्‍याची परवानगी देण्‍यात आली होती.

राजधानी दिल्‍ली मागील काही दिवसांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येमध्‍ये होणारी वाढ ही चिंताजनक आहे. त्‍यामुळे दिल्‍ली विकास प्राधिकरणाने ( डीडीएमआय ) आज नवे निर्बंध लागू केले. यामध्‍ये आता खासगी कार्यालय, रेस्‍टॉरंट आणि बार पूर्णपणे बंद राहतील. खासगी कार्यालयांनी वर्क फॉर्म होम सुरु करावे. तसेच रेस्‍टारंटमधून होम डिलिव्‍हरी सुरु राहील, असे नवीन नियामवलीत स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

निर्बंधाचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई

नवे निर्बंध लागू केले असून याचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदान्‍वये ही कारवाई असेल, असेही ‘डीडीएमआय’ने स्‍पष्‍ट केले आहे. दिल्‍लीत सोमवारी कोरोनाचे १९ हजार १६६ रुग्‍ण आढळले होते. तर १७ जणांचा मृत्‍यू झाला होता. दिल्‍लीत कोरोना संक्रमणाची टक्‍केवारी २५ पेक्षा अधिक नोंदली गेली आहे.

गृह विलगीकरणातील रुग्‍णांसाठी योग वर्ग

दिल्‍लीतील अरविंद केजरीवाल सरकारने गृह विलगीकरणात असणार्‍या रुग्‍णांसाठी योग वर्ग सुरु करण्‍याची घोषणा केली आहे. याचा लाभ ४० हजारहून अधिक नागरिकांना घेतला येईल. एका योग वर्गात केवळ १५ रुग्‍णांना प्रवेश दिला जाईल. कोरोना संसर्ग झालेले बहुतांश रुग्‍ण घरातच उपचार घेत आहेत. त्‍यांनी योगाची मदत घ्‍यावी, असे आवाहन दिल्‍ली सरकारने केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button