रत्नागिरी : देवरूखमध्ये जलपर्यटनास चालना; नगर पंचायतीकडून फेरीबोटीद्वारे चाचपणी (video)

रत्नागिरी : देवरूखमध्ये जलपर्यटनास चालना; नगर पंचायतीकडून फेरीबोटीद्वारे चाचपणी (video)
Published on
Updated on

देवरूख, पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायत देवरूख यांनी शाळा नं. १ समोर सप्तलिंगी नदीवर घातलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी अडवले गेले आहे. ऐरवी पूर्ण कोरडं दिसणारे नदीचे पात्र यावर्षी पावसाळ्यापेक्षाही जास्त पाण्याने भरले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा आपला उद्देश तर सफल झालाच आहे. त्यासोबतच नदी पात्रातील या पाण्यावर छोट्या फायबर बोटी सोडून त्यातून नागरिकांना फेरीबोटींचा आनंद देता येईल का? याची आपण (जलपर्यटनास मिळणार चालना) चाचपणी करण्यात आली.

याकरिता सोमवारी प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्यात आली होती. हा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी झाला असून येथे जल पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. यावर सर्व बाजूंचा विचार करून असणाऱ्या त्रुटी दूर करून गतवर्षीपासून हे स्थळ सुरू करण्याचा मानस नगर पंचायतीने व्यक्त केला आहे.

जल पर्यटनाबरोबरच (जलपर्यटनास मिळणार चालना) यात मत्स्यनिर्मिती करणे, तसेच लगतच्या जमिनाची वापर करून भाजीपाला, फळे, फुल लागवड करून रोजगार निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

सोमवारी कोव्हिड नियमांचे पालन करीत ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत जलबोट फेरीची चाचपणी करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जल पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी नगर पंचायतीच्यावतीने ठोस पावले उचलली जाणार आहेत. एक ते दीड किलोमीटर अंतराचा फेरी बोटीचा आनंद उपभोगता येणार आहे.

तसेच हा सर्व परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यावर भर दिला जाणार आहे. फेरीबोट चाचपणीवेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सर्व नगरसेवक, सोळजाई देवस्थान अध्यक्ष बापू गांधी, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news