मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्या उद्घाटन

mumbai university
mumbai university

मुंबई विद्यापीठाकडून नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उद्या ( दि. १२ ) उदघाटन होणार आहे. सिंधुदुर्ग नगर परिषद यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग उप परिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे. रविवारी दुपारी ३ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भतग सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथे उप परिसराची स्थापना करण्याचे ठरविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांत सौंदर्य, समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती, १२१ किमीची लांब किनारपट्टी, पुरेसा पाऊस, विविध प्रकारच्या फळांचा अभिमान बाळगणारी हिरवी वनस्पती, खाद्यसंस्कृती, आदारातिथ्य आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर कला, नाट्य क्षेत्रासाठीही हा जिल्हा ओळखला जातो.

नुकतेच मुंबई विद्यापीठाने संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे कला, नाट्य क्षेत्रातील अभिनयाचा शास्त्रशुद्ध व्यायवसायिक अभ्यासक्रम म्हणून अभिनय कौशल्य पदविका हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे या सर्व गुणधर्मांना उत्पादक परिणामात रुपांतरीत करण्याच्या दृष्टिने या सिंधुदुर्ग उप परिसराचे महत्व अधोरेखित होणार आहे.

ब्ल्यू टूरिझम, एग्रो बेस्ड प्रोसेंसिंग युनिट्स, कॉयर अँड बांबून आधारीत इंडस्ट्रीज, फिशरीज, फलोत्पादन, अपारंपरिक कृषी उत्पादने, फूड टेक्नॉलॉजी, फ्रूट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, वाईनरी टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात विपूल संधी निर्माण होऊ शकतात. या अशा संशोधन आणि उद्योन्मुख क्षेत्रातील पदवीधरांचा व्यवसाय सुनिनिश्चित करण्याबरोबरच रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

त्याचबरोबर आजीवन शिक्षण आणि इतर विस्तार उपक्रमांसह विद्यापीठ आंतरविद्याशाखीय उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून येथे कोकणातील विपूल साधन सामुग्रीला उपयुक्त, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.

हेही वाचले का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news