Vikas Gogawale: महाड निवडणूक राडा प्रकरणात मोठी घडामोड; मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर

Mahad Election Clash Case: महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानदिवशी झालेल्या राड्या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत.
Vikas Gogawale
Vikas GogawalePudhari
Published on
Updated on

Mahad Election Clash: रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणात एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर आज पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

या प्रकरणात विकास गोगावले अनेक दिवस पसार होते. त्यांच्या अनुपस्थितीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच विकास गोगावले यांनी आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे.

2 डिसेंबरला नेमकं काय घडलं होतं?

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत 2 डिसेंबरला मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि गोंधळ झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महेश गोगावले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप आणि इतर काही कार्यकर्त्यांवर परस्परविरोधी तक्रारींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Vikas Gogawale
Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा; नेमकं काय घडलं होतं?

विकास गोगावले पसार का होते?

गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले आणि महेश गोगावले दोघेही पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे हा मुद्दा थेट उच्च न्यायालयात गेला.

मुंबई उच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करत, “गुन्हा करूनही आरोपी मोकाट फिरत असतील आणि तरीही पोलिसांना ते सापडत नसतील, तर हे गंभीर आहे,” अशा आशयाची टिप्पणी केली होती.

Vikas Gogawale
Balasaheb Thackeray: संजय दत्तमुळे राऊत आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये झाला होता वाद; नेमकं काय घडलं होतं?

इतकंच नाही, तर कोर्टाने सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवत, “जेव्हा अटक करायची असते तेव्हा 24 तासांत करता येते, पण नको असेल तर प्रतिज्ञापत्रं दाखल केली जातात,” अशीही टीका केली.

या प्रकरणात याआधी विकास आणि महेश गोगावले यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतरही ते हजर न झाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झालं.

पोलीस ठाण्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

एक महिन्याच्या कालावधीनंतर महाड पोलिसांना शरण आले आहेत गोगावले याच्या समवेत महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ हे ८ जण पोलिसांसमोर शरण आले. गोगावले यांची महाड पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे. सध्या पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोगावले यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news