सिंधुदुर्गनगरी, पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढ कायम आहे. जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत मिळून एकूण 267 नवीन कोरोनाबाधित सापडले तर दोन दिवसात 331 रुग्ण कोरोना मुक्त झाले. या दोन दिवसांत सावंतवाडीमधील एका 23 वर्षीय युवकास एकूण 5 जणांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला. या दोन दिवसात 1 हजार 214 स्वॅबची तपासणी करण्यात आली. अशी माहिती जिल्हा रुग्णालय चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 56 हजार 427 कोरोनाबाधित सापडले असून त्यातील 53 हजार 675 रुग्ण कोरोनामुक्त घाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 485 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 267 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील प्रकृती चिंताजनक रुग्णांची संख्या 23 असून यातील 17 रुग्ण ऑक्सिजनवर तर 6 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
गेल्या दोन दिवसात एकूण तब्बल 267 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण देवगड 27, दोडामार्ग 22, कणकवली 34, कुडाळ 47, मालवण 32, सावंतवाडी 67, वैभववाडी 10, वेंगुर्ले 21, जिल्ह्याबाहेरील 7 असे आहेत.
सक्रिय रुग्ण- जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 1 हजार 267 रुग्ण सक्रिय आहेत. यात देवगड- 118, दोडामार्ग-73, कणकवली -148, कुडाळ 358, मालवण 112, सावंतवाडी 213, वैभववाडी-66, वेंगुर्ले-157, जिल्ह्याबाहेरील 22 आहेत.
हेही वाचलंत का?