

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावशी येथील श्री लिंग मंदिरजवळ भाजप ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्षा तथा सिंधुदुर्ग जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. दिपलक्ष्मी पडते आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांच्या कारची एकमेकांना जाोरदार धडक बसली.
सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सौ.पडते यांची कार श्री लिंग मंदीर जवळ मिडलकटमधून वळत असताना त्यापाठोपाठ ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या जैतापकर यांच्या कारला जोरदार धडक बसली.
या अपघातात सौ.पडते यांना किरकोळ दुखापत झाली असून कुडाळ येथील रूग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. घटनास्थळी शिवसेना, काँग्रेस, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे.