Nashik Crime : भाजी विक्रेत्याची डोक्यात दगड घालून हत्या, पंचवटीत तीन दिवसांत दोन खून | पुढारी

Nashik Crime : भाजी विक्रेत्याची डोक्यात दगड घालून हत्या, पंचवटीत तीन दिवसांत दोन खून

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

Nashik Crime : पंचवटी परिसरात खूनसत्र सुरूच असून, सराईत गुन्हेगाराच्या हत्त्येला २४ तास उलटत नाही तोच पेठरोडवर पुन्हा एक खुनाची घटना घडली. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या युवकाची टोळक्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. राजू शिंदे अस मयत युवकाचे नाव असून, पंचवटी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

म्हसरूळ लिंक रोडवर रविवारी (दि.२१) रात्री प्रवीण काकड या सराईत गुन्हेगाराची तीन जणांच्या टोळक्याने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पेठरोडवरील आरटीओ ऑफिससमोर मंगळवारी (दि.२३) रात्री उशिरा आणखी एक खुनाची घटना घडली. राजू शिंदे हा पेठरोडवरून जात असताना आरटीओ ऑफिससमोर रस्त्यात दबा धरून बसलेल्या टोळक्याने राजू यास अडवून त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. मृत होत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यावर दगडाचे घाव (Nashik Crime) घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मयत राजू शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. ही घटनादेखील पूर्ववैमनस्य व वर्चस्वावादातून घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एस टी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीला जबाबदार कोण? | गोपीचंद पडळकर

Back to top button