मुंबई-गोवा महामार्गावर साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार

नाणीज; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळ कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि.३०) सकाळी आठच्या सुमारास घडली. फारुख इसाक जमादार (वय ३८, रा. बागलकोट, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.

अधिक महिती अशी की, के ए २३ ए ६६९४ हा ट्रक आज सकाळी कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखर घेऊन जात होता. हातखंबा येथील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. यामध्ये चालक फारुख जमादार हे जागीच ठार झाले. तर कमरान कलादगी (वय २४, रा. बागलकोट, कर्नाटक) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक उलटला तेथे दोन बैल चरत होते. ट्रकच्या धडकेने त्यातील एका बैलाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Back to top button