मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जळगाव दौरा रद्द, खराब हवामानामुळे विमान माघारी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे मुंबईहून जळगाव दौर्यासाठी निघाले होते. निश्चित वेळेत विमानाने उड्डाण देखील केले होते. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले.
यामुळे शिंदे आणि फडणवीस यांचा जळगाव दौरा रद्द करण्यात आला. मार्गात खराब हवामानामुळे उड्डाण घेतलेल्या विमानाला पुन्हा उतराव लागल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Bharat Jodo Yatra update : भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये होणार समारोप
- मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…