बुलढाणा : भरधाव कारची झाडाला धडक, दोन तरुण जागीच ठार

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा – भरधाव कार झाडावर आदळल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि. ३०) पहाटे चिखली-साकेगाव मार्गावरील वाघापूर शिवारात ही दुर्घटना घडली. सुनील किसन देव्हडे (वय ३३) व हर्षद पांडे (३०) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले (दोघेही रा.चिखली) आणि पप्पू राजपूत ( रा. साकेगांव ) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
साकेगाव येथील पप्पू राजपूत याला घरी सोडण्यासाठी चिखली शहरातील चार मित्र कारने चिखलीहून साकेगावकडे जात होते. वाघापूर गावाजवळ भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडावर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, पळसाचे मोठे झाड मुळापासून उखडले गेले. कारचेही मोठे नुकसान झाले.
सुनील देव्हडे व हर्षद पांडे हे जागीच ठार झाले. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. चिखली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच चिखली शहरावर शोककळा पसरली.
हेही वाचा :
- मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…
- Bharat Jodo Yatra update : भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये होणार समारोप
- ‘बीबीसी डॉक्युमेंट्री बंदी’ निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी