रायगड : वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरला, ३८० फूट खोल दरीत पडून शिक्षकाचा मृत्यू | पुढारी

रायगड : वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरला, ३८० फूट खोल दरीत पडून शिक्षकाचा मृत्यू

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड-भोर-पुणे रस्त्यावरील वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरून दरीत पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३) सायंकाळी ही घटना घडली. आज (दि. ४) पहाटे ३ च्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. अब्दुल खुदोबुद्दीन शेख (वय ४१) रा. एरंडी, लातूर असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

अब्दुल खुदोबुद्दीन शेख हे मंडणगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी वरंधा घाटात पाय घसरून ते ३८० फूट खोल दरीत पडले. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. परंतु दरी खूप खोल असल्याने आणि काळोख वाढल्याने शोधकार्यात अडचण येत होती. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button