घंटानाद आंदोलन : मंदिरे उघडण्यासाठी भाजप पाठोपाठ मनसे आक्रमक | पुढारी

घंटानाद आंदोलन : मंदिरे उघडण्यासाठी भाजप पाठोपाठ मनसे आक्रमक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मंदिरे राज्य सरकारने अजूनही उघडली नाहीत म्हणून विरोधी पक्ष मंदिर उघण्यासाठी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करताना दिसून येत आहेत. भाजपने २ दिवसांपूर्वी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले होते. पण आज मनसेने पण मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्याना आदेश दिले होते.

त्याच आदेशाचे पालन करून आज कार्यकत्यांनी राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन केले.

मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बाहेर मंदिरे उघड करावी म्हणून आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी केले.

या आंदोलनाला मनसेचे उपविभाग प्रमुख मयूर सुतार, सारंग सराफ, रूपाली पाटील ठोबरे, राजेंद्र सुयंवशी, अशोक दळवी कोथरूड मतदारसंघ उपाध्यक्ष, नगसेवक साईनाथ बाबर, अभिजित ठेबेकर, गणेश भोकरे, विक्रम आमराळे, कसबा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते व मनसेचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारचा मनसेकडून निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या वेळी मनसेकडून तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराची आरती करण्यात आली.

वसंत मोरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार लॉकडाऊन करत आहे.

राज्य सरकारने मंदिरे सोडून सगळे उघडले आहे.

राज साहेब यांच्या आदेशानुसार मंदिरे उघडली पाहिजेत म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराची आरती करणार आहोत. या सरकारला लवकरात लवकर मंदिरे उघडण्याची जाग यावी म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

Back to top button