वयोवृद्ध महिलेचे हरवलेले मंगळसूत्र आचरा पोलिसांनी दिले तात्काळ शोधून | पुढारी

वयोवृद्ध महिलेचे हरवलेले मंगळसूत्र आचरा पोलिसांनी दिले तात्काळ शोधून

आचरा : उदय बापर्डेकर

आचरा पोलिसांनी आज काही तासांमध्‍ये ६ तोळ्यांचे हरवलेले मंगळसूत्र दाम्‍पत्‍याला शाेधून दिले. हरवलेले मंगळसूत्र परत मिळाल्‍याने रेवंडकर दांपत्याने आचरा पोलिसांचे आभार मानले.

आज सकाळी वयोवृद्ध  दांपत्य  आचरा पोलीस ठाण्यात आले. त्‍यांनी  मंगळसूत्र हरवल्याची सांगितले.  घाबरलेल्या दाम्‍पत्‍याला आचरा पोलीस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी धीर दिला.

पोलिस तात्काळ दांपत्य राहत असलेल्या आचरा शिक्षक कॉलनीजवळ दाखल झाले. आपले सहकारी पोलीस संदिप कांबळे, अक्षय धेंडे, स्वाती जाधव यांच्या सहकार्याने रेवंडकर यांच्‍या घर व घराचा परिसर पिंजून काढत ६ तोळ्यांचे मंगळसूत्र शोधून काढत कर्तव्यदक्षता दाखवून दिली. हरवलेले मंगळसूत्र शाेधून काढणार्‍या  रेवंडकर दांपत्याने आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व त्‍यांचे सहकार्‍यांचे आभार मानले.

हेही वाचलंत का?

 

Back to top button