पुढारी ऑनलाईन डेस्क: समाजात तेढ निर्माण होणार असं कोणीही वागू नये. जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते.
राज्यात सध्या चार शहरांमध्ये तलवारींचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला. त्याचबरोबर भोंग्यावरून तापलेले महाराष्ट्रातील राजकारण या सर्व परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "राज्यात सापडलेल्या तलवारी पाहता समाजात मोठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. राज्यात पोलीस दलाकडून सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस खाते यासाठी सक्षम आहे. राज्यात सापडलेल्या तलवारींसंदर्भात बारकाईने माहिती घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे. भरदुपारी उन्हामध्ये जाणे टाळा. ही उष्णतेची लाट तीव्र असल्याने सर्वांनी आराेग्याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
हेही वाचा