जालना : बुलढाणा बँक दरोड्यातील दोन संशयित ताब्यात; गोंदी पोलिसांना यश - पुढारी

जालना : बुलढाणा बँक दरोड्यातील दोन संशयित ताब्यात; गोंदी पोलिसांना यश

वडीगोद्री ; पुढारी वृत्तसेवा

अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. या दरोड्यातील तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोंदी पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे.

त्या दोघांना बीड येथून आज (शनिवार) पहाटे ताब्यात घेण्यात आले. बँक दरोड्यातील दोन संशयित ताब्यात घेतल्‍याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली आहे.

या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते. दि २९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक के एम मलिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. लवकरात लवकर तपास लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सदर दरोडा प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पाच पथके नेमण्यात आली होती.

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : पट्टणकोडोली येथील भाकणूक

Back to top button