जालना : गोंदी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका गावठी बंदुकीसह दोन तलवारी जप्त | पुढारी

जालना : गोंदी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका गावठी बंदुकीसह दोन तलवारी जप्त

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : गोंदी पोलिसांनी तिर्थपुरीतील गुन्हेगाराच्या घरावर टाकलेल्या धाडीत एका गावठी पिस्तुलासह दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. सोमवारी (दि. १७) टाकलेल्या धाडीत पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळल्या यश आले आहे. जितेंद्रसिंग टाक असे या गुन्हेगाराचे नाव असून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी झोपडपट्टी भागात त्याचे घर आहे.

या गुन्हेगाराच्या घरावर मंगळवारी (दि. १७) गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी घराची झडती घेतली असता एक गावठी बंदूक, दोन तलवारी आणि एक मोठी लोखंडी पकड आढळून आली आहे. सापडलेली शस्त्रे ही १८ हजार रुपये किमतीची असून ती जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश दाभाडे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात जितेंद्रसिंग टाक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button