अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथील हळदा (ता. सिल्लोड) मधील जंगल क्षेत्रालगत असलेल्या शेतात अजिंठा पोलिसांनी छापा टाकून अवैध गावठी दारूची हातभट्टी (अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा) उद्ध्वस्त केली. सहा हजार रुपयांचा मुद्देमालासह शेकडो लिटर दारु बनविण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले.
हळदा येथील गट. न. २०९ मध्ये नामदेव उत्तम पवार ( रा. हळदा) हा शेतात गावठी दारू बनवून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार कैलास पवार, बिट अंमलदार अक्रम पठाण, अरुण गाडेकर, जोनवाल, शेळके यांनी बुधवारी पहाटे छापा टाकून (अवैध गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा) आरोपीस रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडून गावरान दारू, प्लास्टिकचे ड्रम, दारू बनविण्याचे रसायन असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शेकडो लिटर दारु बनविण्याचे रसायन नष्ट केली.
ही कारवाई करून परत येत असताना हळदाहून डकला रोडकडे जाणाऱ्या पुलावर गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली मिळाली. यानंतर पोलिसांनी दारु विक्री करणाऱ्या विनोद शिवाजी वाघ (रा . हळदा) यास अटक केली. वरील दोघांजणावर दारू कायदे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधिक्षक निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक पवन बनसोड, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजित विसपुते, फौजदार कैलास पवार, अक्रम पठाण, पोलिस कर्मचाऱ्याने ही कारवाई केली.
हेही वाचलंत का?