Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : हरनाज तू जिंकलीस! खिल्‍ली उडविणार्‍यांची बोलती केलीस बंद!

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu  : हरनाज तू जिंकलीस! खिल्‍ली उडविणार्‍यांची बोलती केलीस बंद!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

लहानपणी आपल्‍यामध्‍ये काही शारीरिक उणीवा असतात. कोणी खूप अशक्‍त असत' तर कोणी जाड. समवयस्‍कांसाठी हा मुद्‍दा चेष्‍टाचा विषय होतो. असेच काही हरनाज संधू हिच्‍याबरोबरही झालं. मात्र लहानपणापासून हरनाज जिद्‍दी. तिने आपल्‍यातील उणीव दूर करत मिस युनिव्‍हर्स मुकटांवर आपलं नाव कोरत ( Miss Universe 2021 Harnaaz Sandhu )  खिल्‍ली उडविणार्‍यांची बोलती कायमची बंद केली आहे.  "तुम्‍ही दुसर्‍यांबराेबरील तुलना बंद करा.  तुम्‍ही स्‍वत:वर विश्‍वास ठेवल्‍यास जगात काेणतीही गाेष्‍ट अशक्‍य नाही", तिचे स्‍पर्धा जिंकल्‍यानंतरचे हे उद्‍गार आजच्‍या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

अशक्‍त हरनाजची उडवली जात होती खिल्‍ली

शाळेत असताना हरनाज ही खूपच अशक्‍त होती. यावरुन वर्गमित्र व मैत्रीणींनी तिची खिल्‍ली उडवत असत. यामुळे काही काळ ती नैराश्‍यात होती.यावेळी तिच्‍या आईन सावरले. यानंतर तिने स्‍वत:मध्‍ये केलेला बदल हा सर्वांनाच थक्‍क करणार ठरला.
एका मुलाखतीमध्‍ये हरनाज हिने सांगितलं होतं की, शाळेत असताना मी खूप अशक्‍त होते. माझी खिल्‍ली उडवली जायची. याच काळात मी जाणीवपूर्वक आपल्‍या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं. या काळात मला माझ्‍या आईन खूप मोठा मानसिक आधार दिला. हरनाजची आई डॉक्‍टर असून त्‍या चंदीगडमधील सरकारी रुग्‍णालयात स्‍त्री रोग तज्‍ज्ञ आहेत.

 Miss Universe 2021 Harnaaz Sandhu :  शिक्षणातही अव्‍वल

हरनाजने चंदीगडमधील शिवलिक पब्‍लिक स्‍कूलमध्‍ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. सौंदर्यस्‍पर्धा गाजवत असतानाही शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेले नाही. चंदीगडमध्‍येच तिने लोक प्रशासनमध्‍ये पदवी घेतली आहे. सध्‍या ती पदवीत्‍यूर शिक्षण घेत आहे.
७९ देशांच्‍या सुदरींवर मात करत फटकावला मिस युनिव्‍हर्स किताब
हरनाज संधूने ७९ देशांमधील सुंदरींवर मात करत मिस युनिव्‍हर्स किताबावर आपलं नाव कोरलं आहे. तब्‍बल २१ वर्षांनतर भारताला हा किताब मिळाला. हरनाजने मिस युनिव्‍हर्स इंडिया २०२१ स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर मिस युनिव्‍हर्ससाठी कठोर परिश्रम सुरु केले.

हरनाजचे नातेवाईक हे शेतकरी आहेत तसेच काहीजण प्रशासनातही कार्यरत आहेत. घोडेस्‍वारी, पोहणे, अभियन, नृत्‍य आणि पर्यटन ही तिचे छंद आहेत. भविष्‍यात अभिनयात करीयर करायचे आहे. तिने दोन पंजाबी चित्रपटात भूमिकाही साकारल्‍या आहेत.

मनसोक्‍त खावा; पण वर्कआउट हवाच

आज हरनाज डायट करत नाही. तिला आवडणारे सर्व पदार्थ ती मनसोक्‍त खाते; पण तितकाच वर्कआउटही करते. तीस सांगते की तुम्‍ही तुमच्‍या आवडीचे पदार्थ मनसोक्‍त खा पण नियमित वर्कआउट करा, असा सल्‍लाही ती देते.

 स्‍वत:वर विश्‍वास ठेवल्‍यास अशक्‍य काहीच नाही

तुम्‍ही दुसर्‍यांबराेबरील तुलना बंद करा.  तुम्‍ही स्‍वत:वर विश्‍वास ठेवल्‍यास जगात काेणतीही गाेष्‍ट अशक्‍य नाही, तिचे स्‍पर्धा जिंकल्‍यानंतरचे हे उद्‍गार आजच्‍या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news