करमाड : तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त; सर्वात मोठी कारवाई | पुढारी

करमाड : तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त; सर्वात मोठी कारवाई

करमाड (औरंगाबाद), पुढारी ऑनलाईन : अमरावती येथून मुबंईकडे ट्रक मधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून औरंगाबाद (करमाड) जिल्ह्यात गुटख्याने भरलेला ट्रक दाखल होताच औरंगाबाद- जालना महामार्गावर शेकटा शिवारातून जात असताना रविवारी (दि.५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाठलाग करून पकडला. या कार्यवाहीमध्ये दरम्यान ट्रकमधून १ कोटी २५ हजार रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने केली आहे. ही घटनेची करमाड दिलेल्या माहितीनुसार रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, औरंगाबाद जिल्ह्यातुन अमरावती येथून एक आयशर ट्रक गुटखा घेऊन मुबंईकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी पोनि राजेंद्र बोकडे,गणेश मुळे, सुनील गोरे,दीपक सुरोशे, आण्णा गावडे,गणेश कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याचे पथकाने जिल्हा प्रवेशद्वार सापळा रचून बसले होते.

माहिती मिळालेला संशयित ट्रक जिल्हा प्रवेश करताच पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यास शेकटा शिवारातील गोलटगाव फाट्याजवळ (एमएच.०४ जेके ३६१५) हा ट्रक पोलिसांच्या विशेष पथकाने अडवून दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद जालना महामार्गावर शेकटा येथून गोलटगाव फाट्याकडे येताना ट्रक पकडला. तपासणीत गाडीमध्ये १ कोटी २५ हजार रुपयांचा नजर नावाचा गुटखा असल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आला.

तसेच ट्रकही ताब्यात घेतला आहे. पोलीस त्यांची चौकशी करत असून नाव कळू शकले नाही. सदर घटनेची करमाड पोलास ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास करमाड पोलीस करत आहेत. ही कार्यवाही  औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांनी ही कारवाई केली असून करमाड पोलीस ठाण्याचे पोनी राजेंद्र बोकडे, सापोनी प्रशांत पाटील, पोऊनी राजू नागलोत, पोउपनी दादा बनसोडे, पोह गणेश मुळे, सुरेश सोनवणे, पोना सुनील गोरे दीपक सुरसे आदिंनी या कार्यवाही सहकार्य केले.

हेही वाचलं का?

Back to top button