

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर उषा ढोरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे तसेच, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Omicron in Pimpari)
शहरात ओमायक्रॉनचे 6 रुग्ण रविवारी (दि.5) आढळून आले आहेत. या पार्श्वभुमीवर महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना संक्रमणाप्रमाणे आपल्याला ओमायक्रॉन या नव्या आजारावर यश मिळवायचे आहे. महापालिकेच्या रूग्णालयांत नव्या रूग्णांवर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता नेहमी मास्क वापर करावा. स्वतःची तसेच, आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी शहरवासीयांना केले आहे. (Omicron in Pimpari)
हेही वाचा