Amit vs Aadity Thackeray : मनसेचे अमित ठाकरे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना शह देणार ? | पुढारी

Amit vs Aadity Thackeray : मनसेचे अमित ठाकरे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना शह देणार ?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे हेदेखील मैदानात उतरले आहे. किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांमधील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. मनसेने यासाठी किनारपट्टीवर पथके तयार केली आहेत. (Amit vs Aadity Thackeray)

मनसेच्या अमित ठाकरे यांनी सध्या पर्यावरणाचा मुद्दा हातात घेतला असून, यामाध्यमातून शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी (Amit vs Aadity Thackeray) ही योजना आखल्याची चर्चा आहे. राज्याच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

शनिवारी दि. 11 राेजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व पर्यावरण प्रेमींना अमित ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button