Gram Panchayat Election Result : कराड : सुपने, चरेगाव, किवळ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा | पुढारी

Gram Panchayat Election Result : कराड : सुपने, चरेगाव, किवळ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

कराड : पुढारी वृत्तसेवा : Gram Panchayat Election Result : कराड तालुक्यातील ग्रामपंचायत निडणुकीचा निकाल आज (दि. २०) जाहीर झाला. तारुख ग्रामपंचायतीत अपक्ष सरपंच विजयी झाला आहे. येथे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चोरजवाडी ग्रामपंचायत तटस्थ गटाच्या ताब्यात गेली आहे. तर घोलपवाडी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. वनवासमाची ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीने वर्चस्व मिळवले आहे.

Gram Panchayat Election Result : पश्चिम सुपने

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच झाला असून दोन सदस्य विजयी झाले आहेत. तर रयत आघाडीचे चार सदस्य निवडणून आले आहेत. समसमान मतामुळे चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर होणार आहे.

Gram Panchayat Election Result : किवळ ग्रामपंचायत

किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत १२ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. विरोधी भाजप आणि शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

Gram Panchayat Election Result : चरेगाव ग्रामपंचायत

राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून पतंगराव माने गटाचे 10, तर सुरेश माने गटाचे 3 सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी देवदत्त माने विजयी झाले आहेत.

ओंडोशी ग्रामपंचायत

ओंडोशी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता कायम राखली आहे. भोसले गटाचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला सहा जागांवर विजय मिळाला आहे.

आटके ग्रामपंचायत

आटके ग्रामपंचायतीत ३५ वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. महाविकास आघाडी सरपंच विजयी झाला आहे. तर ८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनाजी पाटील गटचे ५ उमेदवार निवडून आले आहेत.

Gram Panchayat Election Result : वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर

वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर करत भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. जगदीश दादा जगताप यांच्या गटाचे सरपंचपदासह ११ सदस्य विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button