औरंगाबाद : तुकडे करून प्रेयसीचा खून; कारमधून शिर, पाय घेऊन जाताना प्रियकराला पकडले | पुढारी

औरंगाबाद : तुकडे करून प्रेयसीचा खून; कारमधून शिर, पाय घेऊन जाताना प्रियकराला पकडले

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीचा तुकडे तुकडे करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खळबळजनक म्हणजे आरोपी पत्रकाराने सोमवारी आणि बुधवारी प्रेयसीच्या शरीराचे काही तुकडे कारने नेऊन देवगाव रंगारी भागात गोडाऊनमध्ये ठेवले. बुधवारी मुंडके आणि पाय घेऊन गेल्यावर घर मालकाला संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविले. त्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपीला पकडले. तेव्हा हो, मी खून केला, अशी पोस्ट त्याने व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली.

अंकिता अनिल श्रीवास्तव असे मृत प्रेयसीचे नाव आहे. तर, सौरभ लाखे, असे आरोपीचे नाव आहे. तो शिऊर (ता. वैजापूर) येथील स्थानिक माध्यमात काम करणारा पत्रकार आहे. त्याने खून का केला?, त्याची अंकिताशी कशी ओळख झाली?, ते केव्हापासून लिव्ह इन मध्ये राहत होते? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सिडको पोलीस त्याला आणण्यासाठी देवगाव रांगरिकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचवलंत का ? 

Back to top button