खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो! विरोधकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल | पुढारी

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो! विरोधकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

आजपासून (दि. १७) पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि आक्रमकपणे शिंदे-फडणवीस सरकार विरोधात संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच सभागृहाच्या पायऱ्यांवर विधीमान्य नसलेल्या गद्दार सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा, सर्वसामान्य जनतेला न्याय द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

Back to top button