केज, पुढारी वृत्तसेवा : साळेगाव येथे मुलानेच पित्याचा खून केल्याची घटना उजेडात आली आहे. शिवाजी केशव हंकारे (55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
14 जून रोजी दुपारी 1:30 वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे (26) याने त्याचे वडील शिवाजी यांना जवळबन येथून मोटार सायकलवर बसवून साळेगाव जवळ असणार्या माळावर नेले. त्या ठिकाणी
दोघे एकत्र दारू पिले. त्या नंतर पवन याने तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता? असा जाब विचारला. या दरम्यान
दोघात बाचाबाची झाली. पवन हंकारे याने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना मारहाण करीत, नंतर कोयत्याने वार केले.
अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला दुसर्या दिवशी आरोपी पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.