मराठा आरक्षण : समर्पित आयोगाला ठोक मराठा क्रांती मोर्चाचा विरोध ; जीआर फाडून आयोगासमोर हवेत भिरकावला | पुढारी

मराठा आरक्षण : समर्पित आयोगाला ठोक मराठा क्रांती मोर्चाचा विरोध ; जीआर फाडून आयोगासमोर हवेत भिरकावला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा:
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी रविवारी (दि. २२) औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात समर्पित आयोगामार्फत सुनावणी घेण्यात आली. परंतु, या आयोगास शहरातील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी तीव्र विरोध करीत, ओबीसी आरक्षण संदर्भातील शासनाचे सर्व जीआर फाडून आयोगासमोर हवेत भिरकावले.

याबाबत बोलताना केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजालाही ओबीसीतून आरक्षण पाहीजे आहे. मात्र समर्पित आयोगात एकही मराठा समाजाचा सदस्य नाही. शिवाय पात्रता नसलेले सदस्य या आयोगात आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे आम्ही याला विरोध करीत शासनाचे जीआर आयोगापुढे हवेत भिरकावले, असे क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

Back to top button