RCB : दिल्लीला घरी पाठवणा-या ‘मुंबईकर’ डेव्हिडवर RCB फिदा! | पुढारी

RCB : दिल्लीला घरी पाठवणा-या ‘मुंबईकर’ डेव्हिडवर RCB फिदा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा अनुभवी अष्टपैलू टीम डेव्हिडने आज मोठा खुलासा केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB कर्णधाराकडून त्याला संदेश कसा मिळाला हे त्याने स्पष्ट केले. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्याला कसा मेसेज करून प्रोत्साहन दिले हे त्याने सांगितले. (RCB ipl 2022)

Image

खरेतर, आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला हा सामना गमावण्याची गरज होती. दुसरीकडे, दिल्लीने हा सामना जिंकला असता तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरले असते आणि आरसीबीचा संघ बाहेर पडला असता. त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने संपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जोरदार साथ दिली. (RCB ipl 2022)

टीम डेव्हिड याआधी आरसीबीकडून खेळला आहे आणि फाफ डू प्लेसिसने त्याला मॅचपूर्वी मेसेज करून प्रोत्साहन दिले. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, सामन्याच्या सकाळी मला फाफ डु प्लेसिसचा मेसेज आला. मॅक्सवेल, विराट आणि डू प्लेसिस हे मुंबई इंडियन्स किट घालून आम्हाला पाठिंबा देत होते. (RCB ipl 2022)

Image

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 7 गडी गमावत 159 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकात पाच विकेट गमावून दिल्लीचा पराभव केला. टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावा करत संघाला लीगच्या आपल्या अखेरच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवून दिला. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.

दिल्ली कॅपिटल्सच्या या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. यामुळेच दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी आनंदाने उड्या मारल्या. आरसीबीचा संघ सलग तिसऱ्या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

Image

दरम्यान, आरसीबीने ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रात मुंबईच्या विजयानंतर फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल पूर्ण मस्ती करताना दिसले. आरसीबीने मुंबई इंडियन्सचे आभारही मानले आहेत. तर टीम डेव्हिडचा फोटो फ्रँचायझीने आरसीबीच्या जर्सीवर लावला आहे, ज्याने 11 चेंडूत 34 धावांची झंझावाती खेळी खेळून सामन्याला कलाटणी दिली. अशा प्रकारे हा विजय आरसीबीसाठी मुंबईपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरला.

 

Back to top button