Aurangabad : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये सापडले एका ४० वर्षीय इसमाचे प्रेत | पुढारी

Aurangabad : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये सापडले एका ४० वर्षीय इसमाचे प्रेत

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण नाथसागर धरणामध्ये बुधवारी (18 मे) औरंगाबाद (Aurangabad) येथील एका ४० वर्षीय इसमाचे पाण्यामध्ये प्रेत आढळून आले. सुरेश प्रभाकर वडोदकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा रा. औरंगाबाद येथील आहे. सदरील इसमाची आत्महत्या करण्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण येथील नाथसागर धरणामध्ये नेहमीप्रमाणे काही तरुण धरणात पोहत होते. यावेळी पाण्यात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. या तरुणांनी तात्काळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांना या घटनेची माहिती माहिती दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार, बीट जमादार गणेश कुलट, पो.कॅा. शिंदे, पो.कॅा. मुजाफर पठाण हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना नाथसागर धरणातील चेन क्रमांक ११७ परिसरात मृतदेह असल्याचे आढळून आले.

पोलीस पथकाने आजूबाजूला शोध घेतला असता मयताचे कपडे पाण्याच्या काठावर सापडले या कपड्यांमध्ये सदरील इसमाचे नाव सुरेश प्रभाकर वडोदकर रा. एन २ ,घर नंबर १४६, १३ वी सिडको योजना जिजामाता औरंगाबाद असा पत्ता मिळाला. सदरील इसमाचा मृतदेह रात्री पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आणि या घटनेची खबर नातेवाईकांना देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. सदरील इसमाने पैठण येथे आत्महत्या का केली याविषयी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, बीट जमादार गणेश कुलट शोध घेत आहे.

हेही वाचा

Back to top button