

पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण शहरातील मंगळवार रोजी मध्यरात्री शहरातील कोर्ट रोडवरील औरंगाबाद येथील रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करीत असताना पैठण पोलिसांनी तीन चाेरट्यांचा पाठलाग केला. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शस्त्रासह पोलिसांनी अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरटे मात्र पसार झाले आहेत. या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पैठण येथील मुंदडा व राघव यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटण्यात आले. गल्ल्यामधील चिल्लर चोरत असताना चोर सापडले. रात्रपाळीच्या गस्तीवरील पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पो. कॉ. भागीले.बोराडे, मनोज वैद्य, संजय मदने, ढाकणे यांनी दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला.
रेकॉर्डवरील गुन्हेगार इरफान पाशा शेख (रा. सूतगिरणी चौक औरंगाबाद) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन चाेरटे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपीकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार किरण दुकानदार राघव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या चाेरट्यांचा शाेध घेण्यासाठी पैठण पोलीस ठाण्याचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचलं का?