Congress BJP Alliance: भाजपशी हातमिळवणी पडली महागात; अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित, कार्यकारिणीही बरखास्त

Congress BJP Alliance Ambernath: अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर पक्षाने कठोर कारवाई केली आहे. प्रदेश नेतृत्वाची परवानगी न घेता आघाडी केल्याने काँग्रेसने नगरसेवकांना निलंबित केले आहे.
Congress BJP Alliance
Congress BJP AlliancePudhari
Published on
Updated on

Congress BJP Alliance Ambernath: अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपसोबत युती करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर अखेर पक्षाने कडक कारवाई केली आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आघाडी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संबंधित नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले आहे. यासोबतच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसकडून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रात ही कारवाई जाहीर करण्यात आली आहे. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले 12 नगरसेवक असताना, प्रदेश कार्यालयाला कोणतीही माहिती न देता भाजपच्या नगरसेवकांसोबत युती करण्यात आली. ही कृती पक्षशिस्तीचा गंभीर भंग करणारी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Congress BJP Alliance
Pune Municipal Election Voting Rules: चार सदस्यीय प्रभागात मतदाराने चार मते देणे बंधनकारक आहे का? प्रशासनानं स्पष्टच सांगितलं

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, भाजपसोबत युती करणाऱ्या सर्व नगरसेवकांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, या निर्णयामुळे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणीही तत्काळ बरखास्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Congress BJP Alliance
Congress BJP AlliancePudhari

अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप, काँग्रेसच्या काही नगरसेवक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली होती. या आघाडीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराने नगराध्यक्षपद पटकावले होते. मात्र या सत्तास्थापनेनंतर काँग्रेस नेतृत्वावर मोठा दबाव निर्माण झाला होता.

Congress BJP Alliance
Pune Municipal Election Social Media Campaign: महापालिका निवडणूक; प्रचारात रील्सची धूम; इन्स्टाग्राम-फेसबुकवर उमेदवारांची हवा

भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेसची पारंपरिक भूमिका आणि विचारधारा धोक्यात येत असल्याची टीका पक्षांतर्गत तसेच बाहेरूनही होत होती. अखेर या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शिस्तभंगाची भूमिका घेत कारवाई केली आहे.

या निलंबनामुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news