Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप? 22 आमदारांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकारणात खळबळ

Ajit Pawar NCP Crisis: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPPudhari
Published on
Updated on

Ajit Pawar NCP Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसभोवती मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून, तब्बल 22 आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, या आमदारांच्या भेटीनंतरच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत अस्वस्थता वाढल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

22 आमदारांशी संपर्क, नेमकं काय सुरू?

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही आमदार सध्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत. पक्षातील नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यावरून नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते आमदार सहभागी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही.

पटेल-तटकरे यांच्या भेटीमागे राजकीय मेसेज?

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शरद पवार भेटीची आहे. सूत्रांच्या मते, आमदारांच्या हालचाली आणि पक्षातील वाढती अस्वस्थता लक्षात घेऊनच ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.

Ajit Pawar NCP
4 Day Work Week: आठवड्यात फक्त 4 दिवस ऑफिस? कर्मचाऱ्यांना सलग 3 दिवस सुट्टी मिळणार; फक्त ही अट पाळावी लागणार

राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप होणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Ajit Pawar NCP
NEET Paper Leak Case: शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसवर पुणे महापालिकेची मोठी कारवाई; JM रोडवरील कॅम्पस सील

या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गट किंवा शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या दाव्यांमुळे सुरू झालेल्या चर्चांकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news